काल "होऊ दे चर्चा" या टास्क मध्ये पुष्कर जोग ने चर्चेत राहण्यासाठी निवडलेले पर्याय पुढीलप्रमाणे

१. बिकिनी घालुन अत्यंत बीभत्सवस्तेत तो फिरत होता.)
२. आपल्या पायावरील केस सर्वांसमोर वॅक्स ने काढून घेणे.
चर्चेत राहण्यासाठी असे पर्याय फक्त आणि फक्त या फुसक्या लाच सुचू शकतात.
सुरवातीपासून पुष्कर ने मला म्हाताऱ्या लोकांचा खूप आदर वाटतो असे म्हंटलं आहे. पण बहुतेक वेळा तोच जास्त अनिल काका किंवा आऊ च्या बद्दल मागे तक्रार करताना दिसून आला. safe zone मधून तर आऊ ना हाकलून देऊन त्यांनी स्वतःला नॉमिनेशन पासून वाचवण्यासाठी. आणि स्वतः नंदकिशोर शी भांड भांड भांडला आऊ चा आदर करा म्हणून. मग याने काय आऊ ना नॉमिनेट करून आदर केला का त्यांचा? भूषण ला नांव ठेवत होता कि तुला म्हाताऱ्यांचा आदर ठेवता येत नाही. अरे भूषण फक्त मस्करी करत होता पण त्याला खात्रीने जास्त आदर आहे म्हाताऱ्याकोतारीनचा. भूषण स्वतः नॉमिनेट झाला होता अनिल काका ना वाचवण्यासाठी. तो खरा आदर. आणि याचा आदर म्हणजे फक्त आणि फक्त दाखवण्यापुरता. अनिल काका असो किंवा आऊ हाच सगळ्यात जास्त त्यांच्या मागे बोलला असेल पूर्ण शो मध्ये. आऊ चा वापर करून घेतला आहे त्याने स्वतःची इमेज बिल्ड करण्यासाठी. जर इतकाच आदर होता किंवा इतकाच जर तो आऊ ना आपल्या आई च्या जागी मानतो तर त्याने का नाही आऊ ना safe केले. का नाही स्वतः safe झोन च्या बाहेर पडला? यापेक्षा तर रेशम बरी. ती आऊ ना तोंडावर तरी बोलते पण "जोडी तुझी माझी" टास्क मध्ये स्वतः नॉमिनेट होऊन तिने आऊ ना safe केलं होते. पण ह्यांच्यासारख्या डब्बल ढोलकी हाच. सारखं तोंडावर किंवा वीकएंड च्या डाव मध्ये बोलायचं कि मी म्हाताऱ्यांचा आदर करतो आणि नंतर सतत त्याच्या विरुद्ध त्याच्या मागे गॉसिप करायचे. सतत त्यांना नावं ठेवायची. मध्ये महेश मांजरेकरांनी त्याला झापल्यामुळे आता मागे बोलायला घाबरतो आहे पण त्या आधी तर सतत आऊ आणि अनिल काका च्या माघारी बोलायचे अनेक videos आहेत voot वर.
अजून सतत एका गोष्टीचा तो सतत दावा करत असतो ती म्हणजे त्याला स्त्रियांबद्दल प्रचंड आदर आहे. तो स्त्रियांशी नेहमी आदराने वागतो वगैरे वगैरे. हे सतत तो त्याच्याच तोंडाने म्हणत असतो आणि वीकएंड च्या डावात तर खास मांजरेकर सरांकडून कौतुक मिळवण्यासाठी तर तो त्याचा एकदम ब्रह्मास्र सारखा उपयोग करतो. पण मग स्मिता शी वागताना कुठे जातो त्याचा तो सो कॉल्ड आदर वगैरे? कि बहुतेक फक्त ज्या मुली त्याच्या शी फ्लर्ट करतात किंवा त्याचे कौतुक करतात त्याच्याचबद्दल आहे हा वूमन रिस्पेक्ट? खरं तर स्मिता त्याच्या शी आणि एकूणच घरात सगळ्यांशीच किती चांगली वागते. प्रत्येकाला मदत करत असते बिचारी. स्वयंपाक घरात तर राब राब राबत असते. तिने पहिल्यांदा केलेल्या उपम्याचे किंवा अजून वेगवेगळ्या पदार्थाचं कौतुक सगळेच करतात अगदी पुष्कर सुद्दा. पुष्कर ने सुद्धा मी पण स्वयंपाक शिकणार वगैरे वल्गना बऱ्याच वेळा केल्याचं आपण पहिलाच आहे पण अजून पर्यंत त्याने एकही पदार्थ केलेला नाही. पण स्मिता मात्र पटापट स्वयंपाक शिकून अगदी सारखी स्वयंपाक करत असते सगळ्यांसाठी. इतकी बिचारी सगळ्यांसाठी करते कि ती फुसक्या ची सो कॉल्ड मैत्रीण आणि बराच काही असणारी सई सतत तिच्यावर जळताना आपल्याला दिसते. अगदी तिला पुनःपुन्हा मोलकरीण म्हणण्यापर्यंत तिची मजल गेली. ते तर आता मांजरेकर सर नी तिला झापलं नाहीतर अजून पण म्हणताच राहिली असती. ह्या फुसक्याला तर तिने हेअर कट करून दिला होता. ह्याला मसाज देते पण त्या स्मिता शी बोलताना या फ़ुसक्याचा तो सो कॉल्ड वूमन रिस्पेक्ट कुठे गायब होतो? सतत तिचा अपमान करत असतो. तिला confuse म्हणत असतो. अरे तिच्यापेक्षा तर मला तूच confuse वाटतोस. कारण कधी तुला मेघा खूप जवळची वाटते तर कधी तिच्या विरुद्ध सई चे कान भरत असतोस. मग खरा confuse तर तूच आहेस रे.

मराठी मध्ये बायकाच्या मागून खेळणाऱ्या किंवा बायकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपले काम साधणाऱ्या माणसाला नेमका कोणता शब्द आहे? मला वाटतं पुष्कर जोग उर्फ पुष्की हा नवीन शब्द रूढ करायला काही हरकत नाही. स्मिता बोलली तेव्हा या महाशयांना भलताच राग आला
साधारण प्रत्येक कॅप्टन च्या टास्क मध्ये हा उमेदवार म्हणून पुढे येतो आणि बहुतेक वेळा हरतो. एरवी सतत म्हणत असतो मला कोणाची गरज नाही मी स्वतःच्या जीवावर खेळतो पण दार वेळी कॅप्टन च्या टास्क वेळी मी एकटाच आहे. माझ्याबरोबर कोणीही नाही म्हणून रडत असतो जर इतका तुला तुझ्या हिमतीवर खेळायचे आहे आणि कोणाची याला गरज नाही जे तो कायम म्हणत असतो मग का रे बाबा मेघा ला म्हणत होतास कि मला सपोर्ट कर म्हणून? का जुई caption झाली तेव्हा रडत होतास?
सई बरोबर माझी फक्त मैत्री आहे असा तू म्हणतोस तर सई त्याला healthy flirting म्हणते. पण इकडे वेगळंच जाणवतं. सकाळी एकदा आपल्या मुलीची आणि बायकोची आठवण काढून झाली कॅमेरा समोर की हा दिवसभर सई शी healthy फ्लर्टींग करायला मोकळा. अधे मध्ये ते बायको ची आठवण काढणे damage कंट्रोल सारखं वाटतं. सतत सई ची सेवा करणं, सतत तिला खांदा देणे, सतत तिला मनवणे हे नक्कीच फक्त आणि फक्त मैत्रीची लक्षणं नाहीत रे बाबा. आऊ सतत तुला त्याबद्दल इशारा देत असतात तो वेळीच समजून घे. शहाणा हो आणि स्वतःचे स्वतः लवकरात लवकर खेळायला शिक या मनापासून तुला शुभेछया. -- Swati Paradkar