Tuesday, 20 February 2018

पाणी 2

माझ्या सासरी तर पाण्याची वेगळीच तऱ्हा. इथे मुद्दाम सांगावेसे वाटतं  की  माझे  सासर किंवा माहेर दोन्ही मराठवाडा किंवा विदर्भ अश्या कोणत्या दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातल्या भागात नाही.तरी दोन्ही गावामध्ये पाण्याचा इतका त्रास तर मग मराठवाड्याच्या  पाणी टंचाई ची कल्पनाच करवत नाही.

माझे सासर रत्नागिरी जिल्याहातील छोट्याश्या गावा मध्ये. ग्रामपंचायतीचे पाणी अजून आलेले नाही. सगळे लोक आपल्या घरातील विहिरी किंवा गावातून वाहणाऱ्या पऱ्यावर म्हणजे ओढ्यावर अवलंबून. 

विहिरी सगळ्यांच्या घरी नाहित. आमच्या घरीसुद्धा नाही.खोतांचं घर असूनसुद्धा. पूर्वी पांडवकालीन तळे आणि त्यातून  घरोघरी नेलेले पाट असे व्यवस्थापन होते शिवाय भरपूर मनुष्यबळ होते पाणी आणण्यासाठी आणि  घराच्या परसातून या पाटाचे पाणी जायचे. म्हणून विहिरींची गरज भासली नाही. पण वर्ल्ड बँक ने लोन दिले. तिथे धरण बांधण्यात आले. धरणात भरपूर पाणी आहे.  पूर्ण  पाट अंडरग्राऊंड करण्याची योजना आली . सगळे पाईप लाईन ने जमिनीखालून नेले पाणी. परंतु पाईप जोडताना सिमेंट घालायला हवे होते. पण इथे आपल्या सिस्टिम मधलं कॅरॅपशन. सिमेंट मध्ये वाळू बरोबर माती सुद्धा मिक्स झाली. आणि कोकणातली मोठ मोठ्या वृक्षांनी आपापली मुळे पाणी शोधण्यासाठी त्यामध्ये घुसवली. मोठे जंजाळ तयार झाले. पाणीच पुढे जात नाही पाईप लाईन्स मधून. त्यामुळे गावाला दारात  मिळणारे पाटाचे पाणीच बंद झाले.  

म्हणजे गावात भरपूर पाणी आहे. पण पाण्याचे कोणतेही नियोजन इतक्या वर्षांत करता आले नाही कोणत्याही सरकार ला. उलट जे चांगले नियोजन पूर्वीपासून होते ते ही बिघडवून टाकले. आता किती बळ आणि वेळ जातो हे पाणी आणण्याच्या कामामध्ये गावातील बायकांचे. शालेय मुलींचा अभ्यासाचा,इतर कला जोपासण्याच्या आणि खेळाच्या वेळेवर गदा येते.

यातून एक मात्र झाले. ज्यांच्या घरात विहिरी आहेत त्यांना रोजगार तयार झाला. हा हा. काही विहिरी असणारे लोक इथे मोटार ने पाणी सिन्टेक्स च्या 500 लिटर च्या टाक्यामध्ये भरतात आणि छोटया टेम्पो ने  विहीर नसणाऱ्या आणि पाणी विकत घेणे परवडणाऱ्या घरामध्ये विकतात. साधारण 200 रु. ला 500 लिटर पाणी.







No comments:

Post a Comment

सांदण

फणसाचे इतके प्रकार करता येतात हे मला अजिबात माहित न्हवते . यावेळी कोकणात गेले असताना हा नवीन पदार्थ मला चाखायला मिळाला. मधुमेह असलेल्या ...