Sunday, 25 February 2018

श्रीदेवी


पाहिलीत असताना मला शाळेत तुला श्रीदेवी आवडते का जयाप्रदा असे विचारले आठवते. सगळीकडे या दोघीची पोस्टर्स लावलेली असायची. अगदी केशकर्तनालय, शिंपी, जनरल स्टोअर्स,किराणा मालची दुकाने आणि बऱ्याच जणांच्या घरी सुद्धा . पण म्हणजे नक्की कोण हे मला काही सांगता आले न्हवते.आता मला सिनेमा फार आवडतो. नोकरी लागली तेव्हा तर allmost प्रत्येक वीकएंड ला मी सिनेमा बघायचे. पुणेमध्ये सिटी प्राईड ला सकाळच्या शो ना डिस्काउंट असायचे. तेव्हढ्यासाठी रविवारी लवकर उठून,आवरुन आम्ही सिनेमा पाहायला जायचो . पण मला लहानपणी सिनेमा बघायला कधीही आवडायचे नाही. हा अजिबात सिनेमा  न बघण्याचा म्हणजे अगदी घरातले सगळे जाणार असले तरी शेजाऱ्यांच्या घरी थांबायची तयारी असण्याचा ते सिनेमा बघण्यासाठी रविवारीही सकाळी लवकर उठून १० ला सिनेमा हॉल मध्ये पोचायच्या प्रवासाचे पहिले श्रेय जाते ते श्रीदेवी ला .

तेव्हा आजकाल सारखे मुव्ही किंवा सिनेमा म्हणायची पद्धत आमच्या शाळेत किंवा गल्ली मध्ये तरी न्हवती. Picture म्हणजे चित्र हे मला फार नंतर समजले. साधारण पूर्ण प्राथमिक शाळेत मला picture म्हणजे movie असाच त्याचा अर्थ असणार न्हवे आहे असा समज होता. आमचे गाव जरी छोटे असले तरी तेव्हा त्यात १२ talkies होती. इचलकरंजी मध्ये मुंबई बरोबर सिनेमा या talkies मध्ये लागायचा. मुंबई बरोबरच इचलकरंजी मध्ये प्रदर्शीत होणार अशी जोरदार जाहिरात व्हायची. एकदम हाऊस फुल वगैरे पण व्हायचा. एकूणच गावाला सिनेमा चे वेड होते. जसे सिनेमा ला इंग्लिश मध्ये picture म्हणतात असा समज होता तसा  सिनेमा हॉल ला इंग्लिश मध्ये talkies म्हणतात हा समज तर माझा पूर्ण शालेय शिक्षण होईपर्यंत होता. नंतर talkies म्हणजे सिनेमा हॉल नसून चलचित्र हा शोध कॉलेज मध्ये वगैरे मला लागला तेव्हा  तर फार आश्चर्य वाटलेलं आठवते आहे.

पण मला सिनेमा आवडायचा नाही कारण त्यावेळी अमिताभ चा जमाना होता. सगळ्या picture मध्ये नुसती fighting. घरी TV नसल्याने आणि सभ्य घरात राहत असल्याने साधे कोणी कोणावर आवाज चढवून बोललेले सहन व्हायचे नाही. आणि इकडे पडद्यावर सगळे एकमेकांना नुसते कपडे धुतल्यासारखे धू  धू  धुवायचे. आणि मी रडून रडून गोंधळ घालायचे.  एक picture धड बघून दिला नाही दोन्ही मुलींनी अशी आई अजून तक्रार करते.

पण याला turning पॉईंट दिला तो श्रीदेवी ने. अर्थात मारामारी चालू झाली की माझी रडारड चालूच व्हायची . १९८९ मधला श्रीदेवी चा 'नागीन' हा मी पाहिलेला आणि आवडलेला चित्रपट. या आधी मी चित्रपट बघायचेच नाही. या picture ला सुद्धा मला जरा जबरदस्ती नेच नेले होते. घरी माझ्याबरोबर थांबायला कोणी न्हवते म्हणून. मला आपण कोणत्या picture ला चाललो आहे हे ही माहीत न्हवते. त्यामधले कलाकार वगैरे माहित असणे खूप दूरची गोष्ट . पण  त्यामधला श्रीदेवी चा डान्स, तिचे दिसणं तिचे वागणं मला इतके मोहवून गेले. तोपर्यंत मला एका ही  नटीला ओळखता यायचे नाही . बस नटीची नावे  माहित होती. १९८९ मध्ये आलेला चालबाज सिनेमा तर मी अजूनही कधीही TV वर आला तर बघते.  त्यातल्या "किसी के हाथ ना आयेगी ये लडकी" ने तर मला वेड लावले होते. त्यासाठी तिला फिल्म फेअर अवॉर्ड मिळाले.  'चांदनी' आणि 'चालबाज' नी जी  मी  श्रीदेवी ची फॅन बनले.  ते आत्ता आलेल्या 'इंग्लिश विंग्लिश', मॉम पर्यंत.




No comments:

Post a Comment

सांदण

फणसाचे इतके प्रकार करता येतात हे मला अजिबात माहित न्हवते . यावेळी कोकणात गेले असताना हा नवीन पदार्थ मला चाखायला मिळाला. मधुमेह असलेल्या ...