Thursday, 25 July 2019

सांदण


फणसाचे इतके प्रकार करता येतात हे मला अजिबात माहित न्हवते . यावेळी कोकणात गेले असताना हा नवीन पदार्थ मला चाखायला मिळाला. मधुमेह असलेल्या व्यक्तींना आणि figure consious असणाऱ्या व्यक्तींना हा sugre free गोड पदार्थ विशेष आवडेल. वेगळा पदार्थ वाटलं म्हणून receipe share करते आहे. अजूनही बाजारात फणस उपलब्ध आहेत. बघा एकदा बनवून.

  1. फणसाचे कापा  आणि बरका असे दोन प्रकार आहेत. या पाककृती साठी आपल्याला फक्त बरका फणसच घायचा  आहे. 
  2. बरका फणस हा खूप juicey असतो. आणि पिकलेल्या फणसाच्या सर्व पाककृतीसाठी (फणसाची पोळी, फणसाच्या घाऱ्या आणि सांदण) बरका फणसाचा वापर करावा लागतो. 
  3.  सांदण हा कोकणातील पारंपारिक गोड पदार्थ आहे.  


साहित्य :    
  • तांदळाचा रवा (इडली रवा )
  • १ छोटा बरका पूर्ण पिकलेला फणस 
  • तेल 
कृती :फणसाचे गरे आणि आठळ्या बाजूला करा. 



एक चाळण बसेल असे पातेले घ्या. चाळणीत गरे घालून चांगले जोर लावून फेटा. 

खाली पातेल्यात गऱ्यांचा रस पडेल. या रसात मावेल इतका इडली रवा घाला. 
मोदक पात्र किंवा इडली पात्र असेल तर त्यातील वाट्याना तेल लावून घ्या. नसेल तर साध्या  वाट्याना आतून तेल लावून घ्या. या वाट्या मध्ये हे मिश्रण घाला. 
मोदक पात्रात किंवा पातेल्यावर चाळण  ठेवून त्यावर या वाट्या ठेवूनमध्यम गॅसवर वाफवून घ्या. 





इडली प्रमाणे वाटीतून किंवा इडली पात्रातून बाहेर काढा. गरमागरम गोड शुगर फ्री सांदण तयार 

  1. एखादी सूरी किंवा चमचा घेऊन तो यात टोचून बघा. 
  2. जर सूरी किंवा चमच्याला पीठ लागला नाही तर गॅस बंद करा. सांदण तयार झाले. 

सांदण

फणसाचे इतके प्रकार करता येतात हे मला अजिबात माहित न्हवते . यावेळी कोकणात गेले असताना हा नवीन पदार्थ मला चाखायला मिळाला. मधुमेह असलेल्या ...