Thursday, 25 July 2019

सांदण


फणसाचे इतके प्रकार करता येतात हे मला अजिबात माहित न्हवते . यावेळी कोकणात गेले असताना हा नवीन पदार्थ मला चाखायला मिळाला. मधुमेह असलेल्या व्यक्तींना आणि figure consious असणाऱ्या व्यक्तींना हा sugre free गोड पदार्थ विशेष आवडेल. वेगळा पदार्थ वाटलं म्हणून receipe share करते आहे. अजूनही बाजारात फणस उपलब्ध आहेत. बघा एकदा बनवून.

  1. फणसाचे कापा  आणि बरका असे दोन प्रकार आहेत. या पाककृती साठी आपल्याला फक्त बरका फणसच घायचा  आहे. 
  2. बरका फणस हा खूप juicey असतो. आणि पिकलेल्या फणसाच्या सर्व पाककृतीसाठी (फणसाची पोळी, फणसाच्या घाऱ्या आणि सांदण) बरका फणसाचा वापर करावा लागतो. 
  3.  सांदण हा कोकणातील पारंपारिक गोड पदार्थ आहे.  


साहित्य :    
  • तांदळाचा रवा (इडली रवा )
  • १ छोटा बरका पूर्ण पिकलेला फणस 
  • तेल 
कृती :फणसाचे गरे आणि आठळ्या बाजूला करा. 



एक चाळण बसेल असे पातेले घ्या. चाळणीत गरे घालून चांगले जोर लावून फेटा. 

खाली पातेल्यात गऱ्यांचा रस पडेल. या रसात मावेल इतका इडली रवा घाला. 
मोदक पात्र किंवा इडली पात्र असेल तर त्यातील वाट्याना तेल लावून घ्या. नसेल तर साध्या  वाट्याना आतून तेल लावून घ्या. या वाट्या मध्ये हे मिश्रण घाला. 
मोदक पात्रात किंवा पातेल्यावर चाळण  ठेवून त्यावर या वाट्या ठेवूनमध्यम गॅसवर वाफवून घ्या. 





इडली प्रमाणे वाटीतून किंवा इडली पात्रातून बाहेर काढा. गरमागरम गोड शुगर फ्री सांदण तयार 

  1. एखादी सूरी किंवा चमचा घेऊन तो यात टोचून बघा. 
  2. जर सूरी किंवा चमच्याला पीठ लागला नाही तर गॅस बंद करा. सांदण तयार झाले. 

Thursday, 28 June 2018

फुसक्या




काल "होऊ दे चर्चा" या  टास्क मध्ये पुष्कर जोग ने चर्चेत राहण्यासाठी निवडलेले पर्याय पुढीलप्रमाणे

१. बिकिनी  घालुन अत्यंत बीभत्सवस्तेत तो फिरत होता.)
२. आपल्या पायावरील केस सर्वांसमोर वॅक्स ने काढून घेणे.

चर्चेत राहण्यासाठी असे पर्याय फक्त आणि फक्त या फुसक्या लाच सुचू शकतात.

सुरवातीपासून पुष्कर ने मला म्हाताऱ्या लोकांचा खूप आदर वाटतो असे म्हंटलं आहे. पण बहुतेक वेळा तोच जास्त अनिल काका किंवा आऊ च्या बद्दल मागे तक्रार करताना दिसून आला. safe zone मधून तर आऊ ना हाकलून देऊन त्यांनी स्वतःला नॉमिनेशन पासून वाचवण्यासाठी. आणि स्वतः नंदकिशोर शी भांड भांड भांडला आऊ चा आदर करा म्हणून. मग याने काय आऊ ना नॉमिनेट करून आदर केला का त्यांचा? भूषण ला नांव ठेवत होता कि तुला म्हाताऱ्यांचा आदर ठेवता येत नाही. अरे भूषण फक्त मस्करी करत होता पण त्याला खात्रीने जास्त आदर आहे म्हाताऱ्याकोतारीनचा. भूषण स्वतः नॉमिनेट झाला होता अनिल काका ना वाचवण्यासाठी. तो खरा आदर. आणि याचा आदर म्हणजे फक्त आणि फक्त दाखवण्यापुरता. अनिल काका असो किंवा आऊ हाच सगळ्यात जास्त त्यांच्या मागे बोलला असेल पूर्ण शो मध्ये. आऊ चा वापर करून घेतला आहे त्याने स्वतःची इमेज बिल्ड करण्यासाठी. जर इतकाच आदर होता किंवा इतकाच जर तो आऊ ना आपल्या आई च्या जागी मानतो तर त्याने का नाही आऊ ना safe केले. का नाही स्वतः safe झोन च्या बाहेर पडला? यापेक्षा तर रेशम बरी. ती आऊ ना तोंडावर तरी बोलते पण "जोडी तुझी माझी" टास्क मध्ये स्वतः नॉमिनेट होऊन तिने आऊ ना safe केलं होते. पण ह्यांच्यासारख्या डब्बल ढोलकी हाच. सारखं तोंडावर किंवा वीकएंड च्या डाव मध्ये बोलायचं कि मी म्हाताऱ्यांचा आदर करतो आणि नंतर सतत त्याच्या विरुद्ध त्याच्या मागे गॉसिप करायचे. सतत त्यांना नावं ठेवायची. मध्ये महेश मांजरेकरांनी त्याला झापल्यामुळे आता मागे बोलायला घाबरतो आहे पण त्या आधी तर सतत आऊ आणि अनिल काका च्या माघारी बोलायचे अनेक videos आहेत voot वर.

अजून सतत एका गोष्टीचा तो सतत दावा करत असतो ती म्हणजे त्याला स्त्रियांबद्दल प्रचंड आदर आहे. तो स्त्रियांशी नेहमी आदराने वागतो वगैरे वगैरे. हे सतत तो त्याच्याच तोंडाने म्हणत असतो आणि वीकएंड च्या डावात तर खास मांजरेकर सरांकडून कौतुक मिळवण्यासाठी तर तो त्याचा एकदम ब्रह्मास्र सारखा उपयोग करतो. पण मग स्मिता शी वागताना कुठे जातो त्याचा तो सो कॉल्ड आदर वगैरे? कि बहुतेक फक्त ज्या मुली त्याच्या शी फ्लर्ट करतात किंवा त्याचे कौतुक करतात त्याच्याचबद्दल आहे हा वूमन रिस्पेक्ट? खरं तर स्मिता त्याच्या शी आणि एकूणच घरात सगळ्यांशीच किती चांगली वागते. प्रत्येकाला मदत करत असते बिचारी. स्वयंपाक घरात तर राब राब राबत असते. तिने पहिल्यांदा केलेल्या उपम्याचे किंवा अजून वेगवेगळ्या पदार्थाचं कौतुक सगळेच करतात अगदी पुष्कर सुद्दा. पुष्कर ने सुद्धा मी पण स्वयंपाक शिकणार वगैरे वल्गना बऱ्याच वेळा केल्याचं आपण पहिलाच आहे पण अजून पर्यंत त्याने एकही पदार्थ केलेला नाही. पण स्मिता मात्र पटापट स्वयंपाक शिकून अगदी सारखी स्वयंपाक करत असते सगळ्यांसाठी. इतकी बिचारी सगळ्यांसाठी  करते कि ती फुसक्या ची सो कॉल्ड मैत्रीण आणि बराच काही असणारी सई सतत तिच्यावर जळताना आपल्याला दिसते. अगदी तिला पुनःपुन्हा मोलकरीण म्हणण्यापर्यंत तिची मजल गेली. ते तर आता मांजरेकर सर नी तिला झापलं नाहीतर अजून पण म्हणताच राहिली असती. ह्या फुसक्याला तर तिने हेअर कट करून दिला होता. ह्याला मसाज देते पण त्या  स्मिता शी बोलताना या फ़ुसक्याचा तो सो कॉल्ड वूमन रिस्पेक्ट कुठे गायब होतो? सतत तिचा अपमान करत असतो. तिला confuse म्हणत असतो. अरे तिच्यापेक्षा तर मला तूच confuse वाटतोस. कारण कधी तुला मेघा खूप जवळची वाटते तर कधी तिच्या विरुद्ध सई चे कान भरत असतोस. मग खरा confuse तर तूच आहेस रे.

जेव्हा स्मिता बिकिनी घालून आली तेव्हा याची का तणतण होत होती? का सई बरोबर स्मिता बद्दल वाकडा तिकडं बोलत होता? स्मिता नॅशनल लेव्हल ची स्वीमर आहे . तिचे ड्रेस आणि स्विमिंग कॉश्च्युम्स स्पॉन्सर केलेले आहेत अशा वेळी तिला ते घालणं भागच आहे . नाही तर त्यांच्या ब्रँड ची जाहिरात कशी होणार? परत एमटीव्ही स्टंट मानिया मध्ये पण स्मिता एक कन्टेस्टंट होती . त्याउलट सई कडे स्वताच असं काय आहे ? काहीच नाही . ना बॉडी ना फिगर ना कष्ट करून मिळवलेलं एखाद्या गोष्टीतलं प्राविण्य . एक लाडावलेली निर्मात्या आईची मुलगी आहे सई . लाडावलेली आणि आळशी. शिवाय स्मिता चे बघून सई नेच शर्मिष्ठा ला बिकिनी घालुन swimming pool मध्ये पाठवलं. स्मिता साठी बिकिनी घालणं काही फार वेगळी गोष्ट नाही. ती उत्तम स्वीमर असल्यामुळे तिला गोवा ला Navy च्या कॅन्डिडेट्स ना शिकवायला बोलावलं होता खास. पण शर्मिष्ठा ३६ वर्ष्यात पहिल्यांदा बिकिनी घालून पूल मध्ये गेली हे या फुसक्या ला चालले पण स्मिता बिकिनी हि फक्त नॉमिनेशन पासून वाचायला घालते असे उद्गार या स्त्री बद्दल सो कॉल्ड आदर असणाऱ्या महापुरुषांनी केलेले आपण सगळ्यांनी पहिलेच. Caption room मध्ये बसून आपल्या पट्ट मैत्रिणीला तो जे काही सांगत होता स्मिता च्या बॉडी बद्दल ते ऐकताना तर तोंडात बोटं घालायची वेळ आणली याने माझ्यावर. स्मिता ची बॉडी कशी attractive आहे. ती कशी ग्लॅमरस आहे त्यामुळे पुरुषांना तिला बघण्यात कसा इंटरेस्ट असणार आणि कसा जर मी बिग बॉस चा प्रेक्षक असतो तर तिला असा बिकिनीत पाहायला मला आवडलं असतं अशी मुक्ताफळं या सो कॉल्ड फेमिनिस्ट म्हणवून घेणाऱ्या माणसाने उधळली तेव्हा त्याला काय म्हणायचं? मला वाटतं मराठी रूढ भाषेत याच प्रकारच्या माणसांसाठी दांभिक हा शब्द निर्माण केला आहे. नाही का?
मराठी मध्ये बायकाच्या मागून खेळणाऱ्या किंवा बायकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपले काम साधणाऱ्या माणसाला नेमका कोणता शब्द आहे?  मला वाटतं पुष्कर जोग उर्फ पुष्की हा नवीन शब्द रूढ करायला काही हरकत नाही. स्मिता बोलली तेव्हा या महाशयांना भलताच राग आला

साधारण प्रत्येक कॅप्टन च्या टास्क मध्ये हा उमेदवार म्हणून पुढे येतो आणि बहुतेक वेळा हरतो. एरवी सतत म्हणत असतो मला कोणाची गरज नाही मी स्वतःच्या जीवावर खेळतो पण दार वेळी कॅप्टन च्या टास्क वेळी मी एकटाच आहे. माझ्याबरोबर कोणीही नाही म्हणून रडत असतो जर इतका तुला तुझ्या हिमतीवर खेळायचे  आहे आणि कोणाची याला गरज नाही जे तो कायम म्हणत असतो मग का रे बाबा मेघा ला म्हणत होतास कि मला सपोर्ट कर म्हणून? का जुई caption झाली तेव्हा रडत होतास?

सई बरोबर माझी फक्त मैत्री आहे असा तू म्हणतोस तर सई त्याला healthy flirting म्हणते. पण  इकडे वेगळंच जाणवतं. सकाळी एकदा आपल्या मुलीची आणि बायकोची आठवण काढून झाली कॅमेरा समोर की  हा दिवसभर सई शी healthy फ्लर्टींग करायला मोकळा. अधे मध्ये ते बायको ची आठवण काढणे  damage कंट्रोल सारखं वाटतं. सतत सई ची सेवा करणं, सतत तिला खांदा देणे, सतत तिला मनवणे हे नक्कीच फक्त आणि फक्त मैत्रीची लक्षणं नाहीत रे बाबा. आऊ सतत तुला त्याबद्दल इशारा देत असतात तो वेळीच समजून घे. शहाणा हो आणि स्वतःचे स्वतः लवकरात लवकर खेळायला शिक या मनापासून तुला शुभेछया. -- Swati Paradkar

Tuesday, 10 April 2018

पाणी ४


नगरपालिकेचे पाणी इतक्या कष्टानी म्हणजे ४-४ दिवसांनी आलेले, त्यामुळे होम अरेस्ट करुन घेऊन भरलेले, भरपूर पाण्याचा साठा करायला लागणारे पाणी किमान शुद्ध आणि पिण्यायोग्य असते का?

साधारण एप्रिल  ते  नोव्हेंबर मध्ये तरी याचे उत्तर 'अजिबात नाही' असंच असते.  इचलकरंजीला पंचगंगा नदीचे पाणी नगरपालिका पुरवते. पंचगंगा उन्हाळ्यामध्ये इतकी आटते की एखादा माणूस सहज चालत चालत नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊ शकतो. पावसाळ्यात किंवा हिवळ्यात कोणीही या नदी मध्ये  कोणी काठावर देखिल उतरत नाही कारण लगेच बुडायला होते पण उन्हाळ्यात पाण्याचा प्रवाह कमीही असतो आणि त्यामुळे रंग सुद्धा काळपट प्रकर्षाने जाणवतो. गाव कोल्हापूर जिल्ह्यामध्ये  असल्यामुळे मुख्य पीक आहे ऊस. उसाची शेती पंचगंगेच्या दोन्ही किनाऱ्यावर होते. शेती साठी सरकार जवळजवळ फ्री वीज देते. किनाऱ्यावरच्या या शेतीवर कधी कधी तर रात्रभर मोटर ने पाणीपुरवठा होतो. ऊसाला जास्त पाणी दिले तरी चालतं पण यामुळे किती पाणी आणि वीज सुद्धा वाया जाते याचा काही हिशोबच नाही. गावात इंडस्ट्री भरपूर असल्यामुळे त्यांचे प्रदूषित पाणी या उरल्या सुरल्या पाण्यामध्ये मिसळते आणि जास्तच काळपट होते.

पावसाळ्यात नदीला खूप पूर येतो. नदीचे पाणी मातकट लाल रंगाचे  होते. शुगर फॅक्टरी नदीच्या डाव्या बाजूला आहे. पावसाळ्याच्या सुरवातीला यातून मळी चे लालसर पाणी यामध्ये सोडले जाते. असे पाणी नगरपालिकेला स्वछ करणे अवघड असते. नंतरच्या दिवसात तर जोरदार पूर येतो आणि काहीवेळा तर पाण्याच्या शुद्धीकरण चा प्लांट नीट काम करत नाही. या दिवसात बरेचदा पाण्यामध्ये आळ्या आढळल्या आहेत.

नंतर नोव्हेंबर मध्ये कारखाने आपले टॅंक धुतात आणि त्यांचे अशुद्ध पाणी नदी च्या पाण्यात मिसळते. या दिवसात बरेचदा गॅस्ट्रो वगैरे रोगांच्या साथी पसरतात.

घरात आलेले पाणी हे किमान उकळुन तरी घ्यावेच लागते.  बरेचदा पहिल्यांदा पाण्यामध्ये तुरटी फिरवावी  लागते त्याने गाळ खाली बसला की पाणी फिल्टर मध्ये टाकावे लागते. मग फिल्टर झालेले पाणी गॅस वर २० मिनिटे उकळायला लागते मग हे पाणी थंड करून प्यायला वापरले जाते. बहुतेक श्रीमंत आणि उच्च मध्यमवर्गीयांकडे aqua gaurds बसवलेले असतात.

तरिही बाहेरगावचे लोक आले की त्यांना या पाण्यातील जंतूंचा प्रादुर्भाव होतो.

काही लोक या सगळ्याला कंटाळून कूपनलिकेतील पाणी पिण्यासाठी वापरतात पण ते पाणी क्षारयुक्त असल्यामुळे  किडनी स्टोन सारख्या दीर्घकाळ चालणाऱ्या आजारांच्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे.

आशा करते कि हे चित्र लवकरात लवकर बदलेल.


Friday, 6 April 2018

Pornima(Full moon night)



Today is Hanuman Jayanti, full moon night. Thinking randomly about full moon nights.
While driving in Bali our local car driver told us that tomorrow is whole moon night. Every whole moon night, he and most of the local Hindus gather at seashore to pray. Though Indonesia has largest Muslim population country in the world, one can see the Hindu culture's signs everywhere. In fact, I found all Indian God's and Goddesses statues in the national museum situated in Jakarta (Capital of  Indonesia). I was quite surprised to see a huge statue of Shri Krishna driving Arjuna in 8 horses chariot at a central square of this city. Many Muslim are named from the characters of Mahabharata like Arjuna, Yudhishthir, etc.

Bali's 80% population is Hindu though Bali is part of Indonesia which is the most populated Muslim country in the world. Many Hindu's relocated to Bali from main islands of Indonesia due to fear of forced conversion. In fact, I have experienced the Hindu culture the moment we landed at Bali Airport and also didn't get any surprise when we realized our driver was Hindu too. Somehow he recognized that we too are Indians and Hindu; his conversation revolved around culture and related topics.

Acting as volunteer host he informed that tomorrow is full moon night and added we all gather together at sea shore to pray. According to him, all Hindus pray at full moon night. But when he asked don't you pray in India on the full moon? I was puzzled.

But then I realized that every full moon night is celebrated as one or other festival in India. HoliPornima, Chaitra Poornima as HanumanJayanti. Jyesth Purnima as Vat Purnima, VaishakhPornima as  Buddha Jayanti. Shravan Purnima as Rakshabandhan. Aswin Pornima as KojagiriPornima. Kartik Poornima as Tripuri Purnima. Margashirsh Purnima as Dutt Jayanti and so on.

So I am wondering why full moon night is so important? What's special about it.?
Not only in Hinduism but also in Buddhism, Jainism, Islam and Christianity full moon night is so important.

Just by curiosity, I started reading more and more about the full moon. and wonders of wonder I got much scientific information how it's related to human body and psychology too.

Just wondering how our ancestors were having that much knowledge in that era.



Sunday, 25 February 2018

श्रीदेवी


पाहिलीत असताना मला शाळेत तुला श्रीदेवी आवडते का जयाप्रदा असे विचारले आठवते. सगळीकडे या दोघीची पोस्टर्स लावलेली असायची. अगदी केशकर्तनालय, शिंपी, जनरल स्टोअर्स,किराणा मालची दुकाने आणि बऱ्याच जणांच्या घरी सुद्धा . पण म्हणजे नक्की कोण हे मला काही सांगता आले न्हवते.आता मला सिनेमा फार आवडतो. नोकरी लागली तेव्हा तर allmost प्रत्येक वीकएंड ला मी सिनेमा बघायचे. पुणेमध्ये सिटी प्राईड ला सकाळच्या शो ना डिस्काउंट असायचे. तेव्हढ्यासाठी रविवारी लवकर उठून,आवरुन आम्ही सिनेमा पाहायला जायचो . पण मला लहानपणी सिनेमा बघायला कधीही आवडायचे नाही. हा अजिबात सिनेमा  न बघण्याचा म्हणजे अगदी घरातले सगळे जाणार असले तरी शेजाऱ्यांच्या घरी थांबायची तयारी असण्याचा ते सिनेमा बघण्यासाठी रविवारीही सकाळी लवकर उठून १० ला सिनेमा हॉल मध्ये पोचायच्या प्रवासाचे पहिले श्रेय जाते ते श्रीदेवी ला .

तेव्हा आजकाल सारखे मुव्ही किंवा सिनेमा म्हणायची पद्धत आमच्या शाळेत किंवा गल्ली मध्ये तरी न्हवती. Picture म्हणजे चित्र हे मला फार नंतर समजले. साधारण पूर्ण प्राथमिक शाळेत मला picture म्हणजे movie असाच त्याचा अर्थ असणार न्हवे आहे असा समज होता. आमचे गाव जरी छोटे असले तरी तेव्हा त्यात १२ talkies होती. इचलकरंजी मध्ये मुंबई बरोबर सिनेमा या talkies मध्ये लागायचा. मुंबई बरोबरच इचलकरंजी मध्ये प्रदर्शीत होणार अशी जोरदार जाहिरात व्हायची. एकदम हाऊस फुल वगैरे पण व्हायचा. एकूणच गावाला सिनेमा चे वेड होते. जसे सिनेमा ला इंग्लिश मध्ये picture म्हणतात असा समज होता तसा  सिनेमा हॉल ला इंग्लिश मध्ये talkies म्हणतात हा समज तर माझा पूर्ण शालेय शिक्षण होईपर्यंत होता. नंतर talkies म्हणजे सिनेमा हॉल नसून चलचित्र हा शोध कॉलेज मध्ये वगैरे मला लागला तेव्हा  तर फार आश्चर्य वाटलेलं आठवते आहे.

पण मला सिनेमा आवडायचा नाही कारण त्यावेळी अमिताभ चा जमाना होता. सगळ्या picture मध्ये नुसती fighting. घरी TV नसल्याने आणि सभ्य घरात राहत असल्याने साधे कोणी कोणावर आवाज चढवून बोललेले सहन व्हायचे नाही. आणि इकडे पडद्यावर सगळे एकमेकांना नुसते कपडे धुतल्यासारखे धू  धू  धुवायचे. आणि मी रडून रडून गोंधळ घालायचे.  एक picture धड बघून दिला नाही दोन्ही मुलींनी अशी आई अजून तक्रार करते.

पण याला turning पॉईंट दिला तो श्रीदेवी ने. अर्थात मारामारी चालू झाली की माझी रडारड चालूच व्हायची . १९८९ मधला श्रीदेवी चा 'नागीन' हा मी पाहिलेला आणि आवडलेला चित्रपट. या आधी मी चित्रपट बघायचेच नाही. या picture ला सुद्धा मला जरा जबरदस्ती नेच नेले होते. घरी माझ्याबरोबर थांबायला कोणी न्हवते म्हणून. मला आपण कोणत्या picture ला चाललो आहे हे ही माहीत न्हवते. त्यामधले कलाकार वगैरे माहित असणे खूप दूरची गोष्ट . पण  त्यामधला श्रीदेवी चा डान्स, तिचे दिसणं तिचे वागणं मला इतके मोहवून गेले. तोपर्यंत मला एका ही  नटीला ओळखता यायचे नाही . बस नटीची नावे  माहित होती. १९८९ मध्ये आलेला चालबाज सिनेमा तर मी अजूनही कधीही TV वर आला तर बघते.  त्यातल्या "किसी के हाथ ना आयेगी ये लडकी" ने तर मला वेड लावले होते. त्यासाठी तिला फिल्म फेअर अवॉर्ड मिळाले.  'चांदनी' आणि 'चालबाज' नी जी  मी  श्रीदेवी ची फॅन बनले.  ते आत्ता आलेल्या 'इंग्लिश विंग्लिश', मॉम पर्यंत.




Wednesday, 21 February 2018

Baby Jackfruit

Jackfruit tree at our backyard
Jackfruit season starts from early summer. This is February and unripe jackfruits can be seen in the Mumbai vegetable market. Ripe jackfruits can also available at few places. But these are imported from Kerala. In the rest of Maharashtra we start eating jackfruits from early February too but unripe baby jackfruits. :)

Jackfruits (ripe, unripe) are easily available in the market. But if you have one jackfruit tree at your backyard it gives more than sufficient for your family and relatives too. One jackfruit tree can hold as many as 25 to 100 jackfruits each year. And one can be a maximum 95cm in length and 40kg in weight. I guess consuming that many ripe fruits were not possible for any family. This might be the reason where Indian women developed so many tasty recipes of jackfruits.  I will share some of the recipes which I learned and tried.

Lets start with the baby jackfruit dishes that we make.

Remember for these dishes the jackfruit must be baby.  To make all the baby jackfruit dishes first take oil and water in small bowl. Apply gently on your hands. and the knife. Cut the jackfruit in two parts from the steam. and again cut these two parts in another 2 parts. Gently pill off its skin by knife. Remove the thick center portion of the jackfruit. put the pieces in pressure cooker. Pour water and little salt in it. Cook in 2 whistles. Let the cooked jackfruit pieces cool. Chop the pieces into very small up to 1 inch long. Now the cooked baby jackfruit is ready for various recipes. You can do modifications in these as per your taste.

Baby Jackfruit Bhaji 1
Ingredients:
  • Raw Jackfruit – 1 (about 3/4th foot in length only. Must be baby)
  • Soaked Toor Dal/field beans/black peas – 4 tspns(Optional)
  • Onion (medium size) – 1, finely chopped
  • Fresh Coconut – grated – 1/2 cup
  • Whole Black Peppers – 8 to 10
  • Jaggery – 1/2 tsp
  • Mustard Seeds  – 1/2 tsp
  • Turmeric  – 1/2 tsp
  • Asafotida  – 1/2 tsp
  • Red Chillies 
  • Oil – 1-2 spns
  • Salt to taste
Heat oil and add the mustard seeds. After they pop, add the  Asafoetida, and Turmeric. Then add the chopped onion and saute till the onion turns translucent. Add the soaked toor dal or beans or peas if you want and saute some more. If you put any of these lentils add some water (about 1/4th cup) and steam, putting some water on the lid too.
Once the onion and dal is fully cooked, add the chopped jackfruit, red chilly powder and salt.
Then add the ground mix of coconut+peppers and the jaggery, stir till they blend well and steam little.

Baby Jackfruit Bhaji 2

Ingredients:
  • Raw Jackfruit – 1 (about 3/4th foot in length only. Must be baby)
  • Fresh Coconut – grated – 1/2 cup
  • Mustard Seeds  – 1/2 tsp
  • Turmeric  – 1/2 tsp
  • Asafoetida  – 1/2 tsp
  • Red Chilies 
  • Oil – 1-2 spns
  • Salt to taste
Heat oil and fry the red chilies. In the remaining oil add the mustard seeds. After they pop, add the  Asafoetida, and Turmeric. Add the chopped jackfruit. Let it cook for 2 mins. Smash the fried red chilies and sprinkle it on jackfruit. Add salt and let it cook for 2 more mins. While serving sprinkle lot of grated coconut on it. (You can pour the coconut while making too. But as coconut is not fully cooked you have to keep the bhaji in the fridge)

Baby Jackfruit Bhaji 3(Fariyali)

Ingredients:
  • Raw Jackfruit – 1 (about 3/4th foot in length only. Must be relay baby)
  • Fresh Coconut – grated – 1/2 cup
  • Cumin Seeds  – 1/2 tsp
  • Red Chilies 
  • Oil – 1-2 spns
  • Salt to taste
Heat oil and fry the red chilies. In the remaining oil add the Cumin seeds. Add the chopped jackfruit. Let it cook for 2 mins. Smash the fried red chilies and sprinkle it on jackfruit. Add salt and let it cook for 2 more mins. While serving sprinkle lot of grated coconut on it. (You can pour the coconut while making too. But as coconut is not fully cooked you have to keep the bhaji in the fridge)

You can make variations in these recipes as per your taste. If you like add garlic or kokam for taste.

We can make big pieces of these baby jackfruits and can dry in summer by sprinkling salt on it. We can use these dried baby jackfruits to make the above dishes in rainy seasons when jackfruit season was gone.

I hope you like these recipes. As the jackfruit grows and becomes young(not fully ripe) there are other different ways to cook it too. We keep making bhaji of unripe jackfruits till May end. Will share those recipes in another post.

पाणी 3

इतका सगळा  इचलकरंजी मध्ये पाण्याचा प्रश्न असून सुद्धा पाण्याचे नियोजन नीट होते अश्यातला भाग नाही. नदीचे पाणी पुरत नसल्यामुळे सरकार ने गल्लोगल्ली कूपनलिका काढून दिल्या आहेत. परंतु त्यावर हातपंप फारच थोड्या ठिकाणी. बाकीच्यांवर विजेचा पम्प. त्या चे बटण सुरु करायला आणि बंद करायला रोज सकाळी एक माणूस ठराविक वेळी येणार आणि २ तासांनी बंद करून जाणार. या कूपनलिकांवर  ज्या तोट्या दिल्या आहेत त्याला बंद करायला कॉक नाही. म्हणजे जर कोणालाच  २ तासामध्ये काही वेळ पाणी नको असेल तर ते तसेच वाहत राहणार कारण बंद करण्याची सोयच नाही. मग २ तास मोठ्या फोर्स ने पाणी वाहून जात असते. उन्हाळ्यात २ तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ सुद्धा या सार्वजनिक कूपनलिकांवर गर्दी असते पण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात फारसे लोक इकडे फिरकत नाहीत. पण या कूपनलिकामधून  रोज २ तास नियमित पणे उपसा  सुरूच. 

मग या कूपनलिका उन्हाळ्यामध्ये आटतात. पाणी कमी येते किंवा काही नलिका ना येताच नाही. बरीचजण या कूपनलिकेचे connection चोरून घरात घेतात. एका कूपनलिकेवर २-३ गल्ल्यामध्ये नळ दिले आहेत. मग मधेच असे कोणी चोरून connection घेतले असेल तर पाणी बाकीच्या नळाला येत नाही. मग  दूर पर्यंत पाणी आणण्यासाठी जावे लागते. 

माझ्याच घराच्या समोरील कूपनलिकेचे पाणी उन्हाळ्यात या चोरट्या connections मुळे  गेले होते. गल्लीतील बाकीच्या बहुतांशी घरामध्ये माझ्या घरासारखे पाण्याचा मोठा साठा करण्याची सोय नाही. या घरातील बायकांनी नागरपालिकांवर मोर्चा काढून चोरटी connections बंद करायला लावली. याहून गरीब घरातल्या बायकांचे पाण्याचे हाल विचारूच नका. मुख्यतः घरातील बायकांचे आणि शालेय मुलीचे. याच दिवसात शाळेत परीक्षांची धामधूम चालू असते. बऱ्याच मुली सकाळी घरातील पाणी भरून मग परीक्षेला जातात अगदी १०/१२ च्या बोर्ड परीक्षेला सुद्धा. 

बहुदा सर्व श्रीमंत लोकांनी स्वतःच्या कूपनलिका काढल्या आहेत आणि पाण्याच्या मोठ्या साठ्याची सोय केली आहे.  पण त्या सुद्धा कूपनलिकाची मोठी संख्या झाल्यामुळे उन्हाळ्यात आटतात. मग टँकर मागवला जातो. बर्याचश्या उच्च माध्यमिक लोकांच्या सोसायटी मध्ये उन्हाळ्यात टँकर मागवला जातो. सर्व सोसायटी मध्ये पाण्याच्या मोठ्या साठ्याची सोय करावी लागते. 

आता कृष्णा आणि वारणा नद्यांचे पाणी पण आणल्यामुळे त्रास काही भागात तरी कमी झाला आहे. पण इचलकरंजी पासून फक्त ३० कि.मी. अंतरावर असणाऱ्या मिरजेचे पाणी ऐन उन्हाळ्यामध्ये लातूर पर्यंत पोचू शकते पण इचलकरंजी मात्र अजून टँकरमुक्त नाही. म्हणजे पाण्याचे नियोजन/व्यवस्थापन नीट करू शकत नाही आहोत आपण आज २०१७ मध्ये सुद्धा. 





सांदण

फणसाचे इतके प्रकार करता येतात हे मला अजिबात माहित न्हवते . यावेळी कोकणात गेले असताना हा नवीन पदार्थ मला चाखायला मिळाला. मधुमेह असलेल्या ...