Sunday, 25 February 2018

श्रीदेवी


पाहिलीत असताना मला शाळेत तुला श्रीदेवी आवडते का जयाप्रदा असे विचारले आठवते. सगळीकडे या दोघीची पोस्टर्स लावलेली असायची. अगदी केशकर्तनालय, शिंपी, जनरल स्टोअर्स,किराणा मालची दुकाने आणि बऱ्याच जणांच्या घरी सुद्धा . पण म्हणजे नक्की कोण हे मला काही सांगता आले न्हवते.आता मला सिनेमा फार आवडतो. नोकरी लागली तेव्हा तर allmost प्रत्येक वीकएंड ला मी सिनेमा बघायचे. पुणेमध्ये सिटी प्राईड ला सकाळच्या शो ना डिस्काउंट असायचे. तेव्हढ्यासाठी रविवारी लवकर उठून,आवरुन आम्ही सिनेमा पाहायला जायचो . पण मला लहानपणी सिनेमा बघायला कधीही आवडायचे नाही. हा अजिबात सिनेमा  न बघण्याचा म्हणजे अगदी घरातले सगळे जाणार असले तरी शेजाऱ्यांच्या घरी थांबायची तयारी असण्याचा ते सिनेमा बघण्यासाठी रविवारीही सकाळी लवकर उठून १० ला सिनेमा हॉल मध्ये पोचायच्या प्रवासाचे पहिले श्रेय जाते ते श्रीदेवी ला .

तेव्हा आजकाल सारखे मुव्ही किंवा सिनेमा म्हणायची पद्धत आमच्या शाळेत किंवा गल्ली मध्ये तरी न्हवती. Picture म्हणजे चित्र हे मला फार नंतर समजले. साधारण पूर्ण प्राथमिक शाळेत मला picture म्हणजे movie असाच त्याचा अर्थ असणार न्हवे आहे असा समज होता. आमचे गाव जरी छोटे असले तरी तेव्हा त्यात १२ talkies होती. इचलकरंजी मध्ये मुंबई बरोबर सिनेमा या talkies मध्ये लागायचा. मुंबई बरोबरच इचलकरंजी मध्ये प्रदर्शीत होणार अशी जोरदार जाहिरात व्हायची. एकदम हाऊस फुल वगैरे पण व्हायचा. एकूणच गावाला सिनेमा चे वेड होते. जसे सिनेमा ला इंग्लिश मध्ये picture म्हणतात असा समज होता तसा  सिनेमा हॉल ला इंग्लिश मध्ये talkies म्हणतात हा समज तर माझा पूर्ण शालेय शिक्षण होईपर्यंत होता. नंतर talkies म्हणजे सिनेमा हॉल नसून चलचित्र हा शोध कॉलेज मध्ये वगैरे मला लागला तेव्हा  तर फार आश्चर्य वाटलेलं आठवते आहे.

पण मला सिनेमा आवडायचा नाही कारण त्यावेळी अमिताभ चा जमाना होता. सगळ्या picture मध्ये नुसती fighting. घरी TV नसल्याने आणि सभ्य घरात राहत असल्याने साधे कोणी कोणावर आवाज चढवून बोललेले सहन व्हायचे नाही. आणि इकडे पडद्यावर सगळे एकमेकांना नुसते कपडे धुतल्यासारखे धू  धू  धुवायचे. आणि मी रडून रडून गोंधळ घालायचे.  एक picture धड बघून दिला नाही दोन्ही मुलींनी अशी आई अजून तक्रार करते.

पण याला turning पॉईंट दिला तो श्रीदेवी ने. अर्थात मारामारी चालू झाली की माझी रडारड चालूच व्हायची . १९८९ मधला श्रीदेवी चा 'नागीन' हा मी पाहिलेला आणि आवडलेला चित्रपट. या आधी मी चित्रपट बघायचेच नाही. या picture ला सुद्धा मला जरा जबरदस्ती नेच नेले होते. घरी माझ्याबरोबर थांबायला कोणी न्हवते म्हणून. मला आपण कोणत्या picture ला चाललो आहे हे ही माहीत न्हवते. त्यामधले कलाकार वगैरे माहित असणे खूप दूरची गोष्ट . पण  त्यामधला श्रीदेवी चा डान्स, तिचे दिसणं तिचे वागणं मला इतके मोहवून गेले. तोपर्यंत मला एका ही  नटीला ओळखता यायचे नाही . बस नटीची नावे  माहित होती. १९८९ मध्ये आलेला चालबाज सिनेमा तर मी अजूनही कधीही TV वर आला तर बघते.  त्यातल्या "किसी के हाथ ना आयेगी ये लडकी" ने तर मला वेड लावले होते. त्यासाठी तिला फिल्म फेअर अवॉर्ड मिळाले.  'चांदनी' आणि 'चालबाज' नी जी  मी  श्रीदेवी ची फॅन बनले.  ते आत्ता आलेल्या 'इंग्लिश विंग्लिश', मॉम पर्यंत.




Wednesday, 21 February 2018

Baby Jackfruit

Jackfruit tree at our backyard
Jackfruit season starts from early summer. This is February and unripe jackfruits can be seen in the Mumbai vegetable market. Ripe jackfruits can also available at few places. But these are imported from Kerala. In the rest of Maharashtra we start eating jackfruits from early February too but unripe baby jackfruits. :)

Jackfruits (ripe, unripe) are easily available in the market. But if you have one jackfruit tree at your backyard it gives more than sufficient for your family and relatives too. One jackfruit tree can hold as many as 25 to 100 jackfruits each year. And one can be a maximum 95cm in length and 40kg in weight. I guess consuming that many ripe fruits were not possible for any family. This might be the reason where Indian women developed so many tasty recipes of jackfruits.  I will share some of the recipes which I learned and tried.

Lets start with the baby jackfruit dishes that we make.

Remember for these dishes the jackfruit must be baby.  To make all the baby jackfruit dishes first take oil and water in small bowl. Apply gently on your hands. and the knife. Cut the jackfruit in two parts from the steam. and again cut these two parts in another 2 parts. Gently pill off its skin by knife. Remove the thick center portion of the jackfruit. put the pieces in pressure cooker. Pour water and little salt in it. Cook in 2 whistles. Let the cooked jackfruit pieces cool. Chop the pieces into very small up to 1 inch long. Now the cooked baby jackfruit is ready for various recipes. You can do modifications in these as per your taste.

Baby Jackfruit Bhaji 1
Ingredients:
  • Raw Jackfruit – 1 (about 3/4th foot in length only. Must be baby)
  • Soaked Toor Dal/field beans/black peas – 4 tspns(Optional)
  • Onion (medium size) – 1, finely chopped
  • Fresh Coconut – grated – 1/2 cup
  • Whole Black Peppers – 8 to 10
  • Jaggery – 1/2 tsp
  • Mustard Seeds  – 1/2 tsp
  • Turmeric  – 1/2 tsp
  • Asafotida  – 1/2 tsp
  • Red Chillies 
  • Oil – 1-2 spns
  • Salt to taste
Heat oil and add the mustard seeds. After they pop, add the  Asafoetida, and Turmeric. Then add the chopped onion and saute till the onion turns translucent. Add the soaked toor dal or beans or peas if you want and saute some more. If you put any of these lentils add some water (about 1/4th cup) and steam, putting some water on the lid too.
Once the onion and dal is fully cooked, add the chopped jackfruit, red chilly powder and salt.
Then add the ground mix of coconut+peppers and the jaggery, stir till they blend well and steam little.

Baby Jackfruit Bhaji 2

Ingredients:
  • Raw Jackfruit – 1 (about 3/4th foot in length only. Must be baby)
  • Fresh Coconut – grated – 1/2 cup
  • Mustard Seeds  – 1/2 tsp
  • Turmeric  – 1/2 tsp
  • Asafoetida  – 1/2 tsp
  • Red Chilies 
  • Oil – 1-2 spns
  • Salt to taste
Heat oil and fry the red chilies. In the remaining oil add the mustard seeds. After they pop, add the  Asafoetida, and Turmeric. Add the chopped jackfruit. Let it cook for 2 mins. Smash the fried red chilies and sprinkle it on jackfruit. Add salt and let it cook for 2 more mins. While serving sprinkle lot of grated coconut on it. (You can pour the coconut while making too. But as coconut is not fully cooked you have to keep the bhaji in the fridge)

Baby Jackfruit Bhaji 3(Fariyali)

Ingredients:
  • Raw Jackfruit – 1 (about 3/4th foot in length only. Must be relay baby)
  • Fresh Coconut – grated – 1/2 cup
  • Cumin Seeds  – 1/2 tsp
  • Red Chilies 
  • Oil – 1-2 spns
  • Salt to taste
Heat oil and fry the red chilies. In the remaining oil add the Cumin seeds. Add the chopped jackfruit. Let it cook for 2 mins. Smash the fried red chilies and sprinkle it on jackfruit. Add salt and let it cook for 2 more mins. While serving sprinkle lot of grated coconut on it. (You can pour the coconut while making too. But as coconut is not fully cooked you have to keep the bhaji in the fridge)

You can make variations in these recipes as per your taste. If you like add garlic or kokam for taste.

We can make big pieces of these baby jackfruits and can dry in summer by sprinkling salt on it. We can use these dried baby jackfruits to make the above dishes in rainy seasons when jackfruit season was gone.

I hope you like these recipes. As the jackfruit grows and becomes young(not fully ripe) there are other different ways to cook it too. We keep making bhaji of unripe jackfruits till May end. Will share those recipes in another post.

पाणी 3

इतका सगळा  इचलकरंजी मध्ये पाण्याचा प्रश्न असून सुद्धा पाण्याचे नियोजन नीट होते अश्यातला भाग नाही. नदीचे पाणी पुरत नसल्यामुळे सरकार ने गल्लोगल्ली कूपनलिका काढून दिल्या आहेत. परंतु त्यावर हातपंप फारच थोड्या ठिकाणी. बाकीच्यांवर विजेचा पम्प. त्या चे बटण सुरु करायला आणि बंद करायला रोज सकाळी एक माणूस ठराविक वेळी येणार आणि २ तासांनी बंद करून जाणार. या कूपनलिकांवर  ज्या तोट्या दिल्या आहेत त्याला बंद करायला कॉक नाही. म्हणजे जर कोणालाच  २ तासामध्ये काही वेळ पाणी नको असेल तर ते तसेच वाहत राहणार कारण बंद करण्याची सोयच नाही. मग २ तास मोठ्या फोर्स ने पाणी वाहून जात असते. उन्हाळ्यात २ तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ सुद्धा या सार्वजनिक कूपनलिकांवर गर्दी असते पण पावसाळ्यात आणि हिवाळ्यात फारसे लोक इकडे फिरकत नाहीत. पण या कूपनलिकामधून  रोज २ तास नियमित पणे उपसा  सुरूच. 

मग या कूपनलिका उन्हाळ्यामध्ये आटतात. पाणी कमी येते किंवा काही नलिका ना येताच नाही. बरीचजण या कूपनलिकेचे connection चोरून घरात घेतात. एका कूपनलिकेवर २-३ गल्ल्यामध्ये नळ दिले आहेत. मग मधेच असे कोणी चोरून connection घेतले असेल तर पाणी बाकीच्या नळाला येत नाही. मग  दूर पर्यंत पाणी आणण्यासाठी जावे लागते. 

माझ्याच घराच्या समोरील कूपनलिकेचे पाणी उन्हाळ्यात या चोरट्या connections मुळे  गेले होते. गल्लीतील बाकीच्या बहुतांशी घरामध्ये माझ्या घरासारखे पाण्याचा मोठा साठा करण्याची सोय नाही. या घरातील बायकांनी नागरपालिकांवर मोर्चा काढून चोरटी connections बंद करायला लावली. याहून गरीब घरातल्या बायकांचे पाण्याचे हाल विचारूच नका. मुख्यतः घरातील बायकांचे आणि शालेय मुलीचे. याच दिवसात शाळेत परीक्षांची धामधूम चालू असते. बऱ्याच मुली सकाळी घरातील पाणी भरून मग परीक्षेला जातात अगदी १०/१२ च्या बोर्ड परीक्षेला सुद्धा. 

बहुदा सर्व श्रीमंत लोकांनी स्वतःच्या कूपनलिका काढल्या आहेत आणि पाण्याच्या मोठ्या साठ्याची सोय केली आहे.  पण त्या सुद्धा कूपनलिकाची मोठी संख्या झाल्यामुळे उन्हाळ्यात आटतात. मग टँकर मागवला जातो. बर्याचश्या उच्च माध्यमिक लोकांच्या सोसायटी मध्ये उन्हाळ्यात टँकर मागवला जातो. सर्व सोसायटी मध्ये पाण्याच्या मोठ्या साठ्याची सोय करावी लागते. 

आता कृष्णा आणि वारणा नद्यांचे पाणी पण आणल्यामुळे त्रास काही भागात तरी कमी झाला आहे. पण इचलकरंजी पासून फक्त ३० कि.मी. अंतरावर असणाऱ्या मिरजेचे पाणी ऐन उन्हाळ्यामध्ये लातूर पर्यंत पोचू शकते पण इचलकरंजी मात्र अजून टँकरमुक्त नाही. म्हणजे पाण्याचे नियोजन/व्यवस्थापन नीट करू शकत नाही आहोत आपण आज २०१७ मध्ये सुद्धा. 





Tuesday, 20 February 2018

पाणी 2

माझ्या सासरी तर पाण्याची वेगळीच तऱ्हा. इथे मुद्दाम सांगावेसे वाटतं  की  माझे  सासर किंवा माहेर दोन्ही मराठवाडा किंवा विदर्भ अश्या कोणत्या दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातल्या भागात नाही.तरी दोन्ही गावामध्ये पाण्याचा इतका त्रास तर मग मराठवाड्याच्या  पाणी टंचाई ची कल्पनाच करवत नाही.

माझे सासर रत्नागिरी जिल्याहातील छोट्याश्या गावा मध्ये. ग्रामपंचायतीचे पाणी अजून आलेले नाही. सगळे लोक आपल्या घरातील विहिरी किंवा गावातून वाहणाऱ्या पऱ्यावर म्हणजे ओढ्यावर अवलंबून. 

विहिरी सगळ्यांच्या घरी नाहित. आमच्या घरीसुद्धा नाही.खोतांचं घर असूनसुद्धा. पूर्वी पांडवकालीन तळे आणि त्यातून  घरोघरी नेलेले पाट असे व्यवस्थापन होते शिवाय भरपूर मनुष्यबळ होते पाणी आणण्यासाठी आणि  घराच्या परसातून या पाटाचे पाणी जायचे. म्हणून विहिरींची गरज भासली नाही. पण वर्ल्ड बँक ने लोन दिले. तिथे धरण बांधण्यात आले. धरणात भरपूर पाणी आहे.  पूर्ण  पाट अंडरग्राऊंड करण्याची योजना आली . सगळे पाईप लाईन ने जमिनीखालून नेले पाणी. परंतु पाईप जोडताना सिमेंट घालायला हवे होते. पण इथे आपल्या सिस्टिम मधलं कॅरॅपशन. सिमेंट मध्ये वाळू बरोबर माती सुद्धा मिक्स झाली. आणि कोकणातली मोठ मोठ्या वृक्षांनी आपापली मुळे पाणी शोधण्यासाठी त्यामध्ये घुसवली. मोठे जंजाळ तयार झाले. पाणीच पुढे जात नाही पाईप लाईन्स मधून. त्यामुळे गावाला दारात  मिळणारे पाटाचे पाणीच बंद झाले.  

म्हणजे गावात भरपूर पाणी आहे. पण पाण्याचे कोणतेही नियोजन इतक्या वर्षांत करता आले नाही कोणत्याही सरकार ला. उलट जे चांगले नियोजन पूर्वीपासून होते ते ही बिघडवून टाकले. आता किती बळ आणि वेळ जातो हे पाणी आणण्याच्या कामामध्ये गावातील बायकांचे. शालेय मुलींचा अभ्यासाचा,इतर कला जोपासण्याच्या आणि खेळाच्या वेळेवर गदा येते.

यातून एक मात्र झाले. ज्यांच्या घरात विहिरी आहेत त्यांना रोजगार तयार झाला. हा हा. काही विहिरी असणारे लोक इथे मोटार ने पाणी सिन्टेक्स च्या 500 लिटर च्या टाक्यामध्ये भरतात आणि छोटया टेम्पो ने  विहीर नसणाऱ्या आणि पाणी विकत घेणे परवडणाऱ्या घरामध्ये विकतात. साधारण 200 रु. ला 500 लिटर पाणी.







Monday, 19 February 2018

पाणी


पाण्याबद्दल एक FB वर पोस्ट वाचण्यात आली. ५३ दिवस काही गावामध्ये सरकारी नळाला पाणी येत नाही. मनमाड मध्ये नेहमीच पाणी २०-२५ दिवसांनी येत. आणि जर आधि आला तर उलट तिथल्या लोकांना कटकट वाटते. पाणी भरायचे काम वाढते म्हणून.

सुरवातीला वाचताना मला पण मज्जाच  वाटली. पुणे ला किंवा दादर ला आता २४ तास पाणी असण्याची इतकी सवय झाली आहे २०-२५ दिवस सोडा २-५ तास पाणी नसले  क एकदम वैतागायला होते. तरी सोसायटी मध्ये आधीच नोटीस वगैरे आलेली असते. शिवाय वॉचमन सुद्धा कधी कधी प्रत्येक घरात जाऊन आठवण करून देतो "उद्या पाणी येणार नाही आहे". वगैरे. तरी इतक वैतागायला होते. आणि माणसं चक्क ५३ दिवस पाणी न येता राहिली. 

Bureau of  Standards, IS:1172-1993, प्रमाणे प्रत्येक माणसाला रोज २०० लिटर पाणी आवश्यक आहे.  जर हे खरं मानलं आणि घरात अगदी ४-५ माणसं जरी धरली तरी २०० x ५=१००० लिटर पाणी आवश्यक. आणि जर ५३ दिवसाचा पणीसाठा म्हणजे ५३००० लिटर पाणी साठवायला हवे. इतके पाणी साठवण्याची सोय प्रत्येक घरात असते?

अर्थात मला इतके आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. माझी  सगळी  शालेय वर्ष इचलकरंजी मध्ये गेली. इचलकरंजी हे जरी पश्चिम महाराष्ट्रातले गाव असले तरीसुद्धा उन्हाळ्यात पाण्याचे प्रचंड हाल असायचे. म्हणजे अजूनही असतातच. आठवड्यातून एकदा पाणी येते. ते पण पाण्याचा वार ठरलेला नाही. वेळ ठरलेली नाही. मग अंदाजाने या आठवड्यात गुरुवारी पाणी आले  म्हणजे पुढच्या आठवड्यात बुधवार पासून शुक्रवार रात्री पर्यंत कधीही येईल असा आपणच अंदाज बांधायचा(बहुधा तो येतो बरोबर.) पण मग बुधवार सकाळ पासून ते पाणी येईपर्यंत पुढच्या आठवड्यात home arrest. कोणीतरी एकाने घरी थांबायचं. एरवी उन्हाळा सोडून पण २ दिवसांनी पाणी येते. तेव्हा पण तेच. नक्की कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेला पाणी येणार याची काहीही खात्री नाही. आपणंच अंदाज बांधायचा. बहुदा तो बरोबर येतो. आणि त्या दिवशी त्या वेळेला घरी थांबायचे.  पण जर अंदाज बरोबर आला नाही तर मग ४ दिवसांनी पाणी मिळणार आणि उन्हाळ्यात तर १५ दिवसांनी. अर्थात ४ दिवस जरी पाणी आले  नाही तरी सगळं व्यवस्थित चालेल इतका पाण्याचा साठा आमच्याकडे असतोच. त्याला पर्याय नाही. २००० लिटर ची टाकी वापरायला आणि पिण्यासाठी वेगळा साठा असा सगळा मामला. तरी उन्हाळ्यात प्रश्न येतोच. त्यात कोणी पाहुणे आले तर मग विचारायलाच नको. पाणी येणाऱ्या दिवशी बाहेर कुठेही जायचे नाही. पाणी आल्यावर पाण्याच्या टाक्या तर भरायच्याच. पण बादल्या, हंडे, तांबे, पातेली,साटेली, कुंडे,गाडगी,मडकी,घागरी अगदी फुलपात्री सुद्धा सगळी भरून घ्यायची . अंघोळी spl. नाहणे उरकून घ्यायचे घरातल्या होतील तितक्या जणांचे.  शक्य असेल तर कामवालीला बोलावून घेऊन तेव्हाच धुणं, भांडी,फारशी असे सगळे उरकून घायचे. झाडांना पाणी घालायचे. हे आजही चालू असते. २०१७ मध्ये सुद्धा. 

सांदण

फणसाचे इतके प्रकार करता येतात हे मला अजिबात माहित न्हवते . यावेळी कोकणात गेले असताना हा नवीन पदार्थ मला चाखायला मिळाला. मधुमेह असलेल्या ...